प्रसिध्द गिर्यारोहक अरून सावंत याचा रँपलिग करताना दरीत पडून मृत्यू

मुरबाड- मुरबाड तालुक्यातील वाल्हीवरे गावाजवळील हरिश्चंद्र गडावर रॅपलिंग साठी गेलेल्या प्रसिद्ध गिर्यारोहकाचा दरीत पडून मृत्यू
हरिश्चंद्र गडावर रॅपलिंग गेलेल्या प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत यांचा दरीत पडून मृत्यू झाला आहे. कोकण कड्यावरील माकडनाळ भागात काल शनिवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली. त्यानंतर गिर्यारोहक व स्थानिकांच्या मदतीने त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला. माकडनाळ भागात सावंत यांच्यासोबत तिघेजण होते. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं.
अरुण सावंत आणि इतर 30 जणांचा ग्रुप रॅपलिंगसाठी मुरबाड तालुक्यातील वालीवरे गावाजवळील हरिश्चंद्र गडावर आले होते. कोकण कडा ते माकडनाळ इथं ते रॅपलिंग करणार होते. यातील पहिला टप्पा पूर्ण करून त्यांच्यासोबतचे सर्वजण खाली उतरले. शेवटी असलेले अरूण सावंत मात्र दरीत कोसळले.
कोकणकडा जवळपास अठराशे फूट उंच आहे. कोकणकड्याहून आडवा रोप बोल्ड करायच्या प्रयत्नात असताना फाॅल झाला. त्यानंतर 550 फूट खोल दरीत खडकांवर ते पडले आणि जागेवरच मृत्यू झाला. अरुण सावंत यांचा मृतदेह आज रविवारी दुपारच्या सुमारास अत्यंत छिन्नविछिन्न अवस्थेत मिळाला आहे.
ट्रेकर्सना मार्गदर्शन करणारे अरुण सावंत यांचा असा दरीत पडून मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे. ट्रेकिंगच्या क्षेत्रात त्यांचं मोठं नाव मानलं जातं. गेल्या 25 वर्षा पासून नवोदित गिर्यारोहकाना मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शकाच्या मृत्यूने गिर्यारोहणप्रेमींवर शोककळा पसरली आहे
Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web