माळशेज- पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने निर्सग रम्य अश्या माळशेज घाटातील पर्यटन केंद्रामध्ये पहिल्यांदाच पंतग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते . या पंतग महोत्सवाच्या उदघाटन निमित्य स्थानिक आदिवासी ग्रामस्थ व विद्यार्थयांच्या उपस्थित शानदार शुभारंभ करण्यात आला होता.
विशेष म्हणजे पर्यटनाच्या ठिकाणी पर्यटक आर्कषित व्हावा या हेतूने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते सुमारे दोन हजार पंतग प्रेमींनी या महोत्सवात सहभागी झाले आहे.
संक्रातीचे औचित्य साधून पंतग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवात सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्ती करीत ५० रुपये शुल्क आकारण्यात आले. महोत्सवाच्या ठिकाणी पतंग , मांज्यासह विविध प्रकारच्या वस्तूसह खाद्यपदार्थाचे सुमारे २५ स्टोल लावण्यात आले होते .पंतग महोत्सव पर्यावरणपूरक असून कोणत्याही पक्ष्याना या पासून इजा होणार नाही. यासाठी प्रतिबंधक मांज्याचा वापर टाळण्यात आला होता . या ठिकाणी ड्रोन पतंगबाजी या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरले होते.
दरम्यान उदघाटन प्रसंगी पर्यटन विकास महामंडळाच्या वरिष्ठ व्यस्थापक अधिकारी शिप्रा बोरा , माळशेज घाट पर्यटन निवासाचे व्यस्थापक गाडेकर, यांनी आदिवासी महिलांची लेझीम , आदिवासीच्या रुडी परंपरा गोफ कला अश्या विविध कालाचे दर्शन या निमिताने पर्यटकाना झाले. पर्यटक व पतंग प्रेमीनी या महोत्सवाला मोठ्या प्रमाणात हजेरी लाऊन,पतंग महोत्सवाची शोभा वाढवली.