महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय.२२ सनदी अधिकाऱ्याच्या बदल्या

मुंबई:- महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनात मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यातील तब्बल २२ वरिष्ठ सनदी अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, पुढील दोन दिवसात अजून,मोठ्या प्रमाणात फेरबदल केले जाणार असल्याचे समजते.मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रविण दराडे यांची समाज कल्याण विभागाचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्या जागी महाराष्ट्र जीवन प्रधिकरणाचे सदस्य सचिव पी.वेलरासू यांची बदली करण्यात आली आहे.ग्रामविकास खात्याचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांची ऊर्जा खात्याचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.सिंधुदूर्गचे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांची माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक जे. मुखर्जी यांची नियुक्ती अपर मुख्य सचिव अल्पसंख्यांक विकास विभाग मंत्रालय येथे करण्यात आली आहे.अल्पसंख्यांक विकास विभागाचे प्रधान सचिव एस. ए. तागडे यांची बदली वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव म्हणून करण्यात आली आहे.
वस्त्रोद्योग खात्याचे सचिव डॉ. के एच गोविंदराज यांची बदली अतिरिक्त महानगर आयुक्त मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बी.वेणुगोपाल रेड्डी बदली वने खात्याचे प्रधान सचिव म्हणून करण्यात आली आहे.विक्रीकर आयुक्त राजीव जलोटा यांची ग्रामविकास खात्याचे अपर मुख्य सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.विक्रीकर आयुक्त शैला ए यांची नियुक्ती अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती येथे करण्यात आली आहे. सातारच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल बदली अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे येथे करण्यात आली आहे. त्यांच्या जागी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मृद व जलसंधारण औरंगाबादचे आयुक्त दीपक सिंगला नियुक्ती गडचिरोलीचे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे.सोलापूरचे जिल्हाधिकारी आर. बी. भोसले यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कल्याण येथे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून करण्यात आली आहे.पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांची बदली आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था येथे आयुक्त म्हणून करण्यात आली आहे.रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी यांची नियुक्ती अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पुणे महानगर परिवहन महामंडळ पुणे येथे करण्यात आली आहे.वेणूगोपाल रेड्डी यांची नियुक्ती महसूल व वन विभागात प्रधान सचिव म्हणून करण्यात आली आहे.
समाज कल्याण पुणेचे आयुक्त मिलिंद शंभरकर यांची सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.ए. जगताप यांची नियुक्ती अतिरिक्त विभागीय आयुक्त नागपूर विभाग येथे करण्यात आली आहे.सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी के.मंजुलक्ष्मी यांना बढती देवून सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी यांची भंडारा जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.तर मदन नागरगोजे यांची नियुक्ती माहिती तंत्रज्ञान विभागात संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web